३ जानेवारीला पोहोचणार शेगावी…
अमळनेर:- अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीस २७ डिसेंबर सकाळी सहा वाजता गजानन महाराज मंदिरापासून सुरुवात झाली. त्या अगोदर सकाळी सहा वाजता महा आरती करण्यात आली.
संत गजानन महाराज मंदिरात वारीचे स्वागत वारी प्रमुख ज्योती पवार व संस्थानचे अध्यक्ष आर. बी पवार, नितीन भावे, अशोक भावे, रघुनाथ पाटील,डॉ जिजाबराव पाटील, मोहित पवार प्रवीण पवार, श्रीकृष्ण चव्हाण, राजू पाटील, निंबा पाटील, वसंतराव जाधव, मधुकर शिंपी, डॉ जगदीश साठे यांनी केले. संत गजानन महाराज महिला वारी शेगावला निघत असताना मंदिरापासून तर शहरातील सर्व कॉलनीमध्ये रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. विद्याविहार कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पितांबर पाटील यांनी सहपत्नीक वारीचे स्वागत करत फटाक्यांची आतषबाजी केली. प्रत्येक कॉलनीमध्ये वारीचे स्वागत करण्यात आले. वारीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील 150 महिला वारीत समावेश झाल्या व वारी शिस्तबद्ध पद्धतीने निघत संत गजानन महाराजांचा जयघोष गजानन भक्तांनी करत शहर दुमदुमून गेले. तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील महिला पायीवारीत बहुसंख्येने शेगावला गेल्या. वारीचा काही ठिकाणी मुक्काम होणार असून प्रत्येक गावात सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचा मुक्काम, जेवण गजानन भक्त व सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व व्यवस्था केली आहे. सदर वारी 3 जानेवारी 2023 रोजी शेगावला पोहोचणार आहे. संत गजानन महाराज मंदिरात राजेंद्र बागुल, ए.बी धनगर, ह.भ.प दत्तात्रय पाटील,प्रमोद पवार, मिलिंद संदानशिव,विजू वाणी, संजय पाटील, ईश्वर महाजन, व अनेक गजानन भक्त बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024