जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीसात दिली फिर्याद….
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे जुन्या वादातून एकाला काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी शरद नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या समाधान रवींद्र पाटील याने अंगणात येत सांगितले की, मागील महिन्यात नालीची घाण टाकण्यावरून तू माझ्या वडिलांशी वाद घातला होता, असे सांगत लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यावर, कमरेवर मारहाण करत माझ्या वडिलांशी वाद घातला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यावेळी फिर्यादीच्या आईला दुखापत झाली असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. कॉ. भरत इशी करीत आहेत.