
विवाहितेने दिली सासरच्या मंडळींविरुद्ध फिर्याद…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या विवाहितेचा माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध मारवड पोलीसात फिर्याद देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील निम येथील माहेर असलेल्या फिर्यादी तेजस्विनी धर्मराज बाविस्कर यांचे लग्न मनुदेवी आडगाव ता. यावल येथील धर्मराज रामदास बाविस्कर यांच्यासोबत झाले असून त्यांना दोन अपत्य आहेत. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी गोड बोलून दागिने काढून घेतले तसेच सोन्याची ब्रासलेट व पाच लाख रुपये हुंडा द्यायला हवा होता म्हणून छळ सुरू केला. त्यानतंर विविध कारणांवरून विवाहितेला माहेरी सोडून जाऊ लागले. विनवण्या करून संसार चालवू पाहणाऱ्या विवाहितेला मारहाण व खाण्यापिण्याची आबाळ करू लागले तसेच एप्रिल महिन्यात मुलीसह विवाहितेला माहेरी हाकलून लावले. त्यानतंर १८ डिसेंबर रोजी विवाहितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्याचे समजल्याने सासरची मंडळीनी निम येथे येवून तक्रार का केली अशी विचारणा करत विवाहितेच्या वडिलांना मारहाण व शिवीगाळ करून पाच लाख रुपये दिले तरच नांदण्यास घेवून जावू असे सांगून निघून गेले. त्यामुळे विवाहितेने मारवड पोलीसात धर्मराज रामदास बाविस्कर, विजया रामदास बाविस्कर, रामदास आनंदा बाविस्कर, लक्ष्मी रामदास बाविस्कर सर्व राहणार आडगाव ता. यावल, ललिता प्रमोद ठाकरे रा. सुरत, योगिता सुनील पवार रा. मुंबई यांच्या विरुद्ध तक्रार केली असून मारवड पोलीसात भादवि कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत.







