
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे आभा कार्ड (डिजिटल हेल्थ कार्ड) व आयुष्यमान भारतचे कार्ड काढण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
काल १४ जानेवारी रोजी मारवड येथे तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आभा कार्ड व आयुष्यमान भारतचे कार्ड काढण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी आभा कार्ड व गोल्डन कार्ड संदर्भात माहिती दिली. आभा कार्डमुळे व्यक्तीच्या आरोग्य संदर्भातील माहिती डिजिटल रूपात संग्रहित करण्यात येते. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री तपासणी अधिक सोयीचे होते आयुष्यमान भारत कार्डद्वारे पाच लाख पर्यंत निशुल्क उपचार होतो. या कॅम्प मध्ये उपस्थित नागरिकांचे आभा कार्ड व आयुष्यमान भारतचे कार्ड काढण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच आशा सुभाष भिल, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, अनिल पाटील, सचिन अशोक पाटील, जगदीश भिल सुरेश बाविस्कर, सीमा पाटील चंद्रकांत कोळी, उज्वल पाटील, रजनी गुरव, कविता चौधरी, ग्राम विकास अधिकारी रविंद्र सनेर, लिपिक सुभाष पाटील, आशा सेविका संगीता चौधरी, वैशाली पाटील, बापू चौधरी व ग्रामस्थ हजर होते.







