अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, दि. 12 जानेवारी गुरुवार रोजी “राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांना जयंती” निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आणि वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन डॉ. वसंत देसले यांनी तर, स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयातील प्राध्यापक विश्वनाथ पाटील यांनी केले. प्रतिमा पुजनानंतर प्राचार्यांनी राजमातांच्या शिवस्वराज्यातील अपूर्व योगदानाबद्दल मत मांडले. आणि याच उर्जेवर छत्रपती शिवाजींनी रयतेचे राज्य निर्माण केले असे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी विवेकानंदांच्या धर्म चिंतनाचे विचारही प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जितेंद्र माळी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. सतीश पारधी, प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. देवदत्त पाटील, जगदीश साळुंखे, सचिन पाटील, मंजुषा गरुड, तसेच श्यामकांत पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव व राष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली