अमळनेर:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा प्रताप महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये दि.११ ते २९ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहेत. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान तीनही विभागाचे पेपर सुरळीत सुरू आहेत.
दोन सत्रात सुरू असणारे पेपर सकाळी १०:३० ते ०१:३० व दुपारी ०२:३० ते ०५: ३० या वेळेत आहेत पेपरमध्ये एम.बीए., एम.सी.ए.,डी.सी.जे.,डिप्लोमा इन स्टॅट, बाल संगोपन,एम.ए. मराठी, हिंदी विविध विभागांच्या परिक्षेत वेगवेगळ्या दिवशीचे असे एकूण आठशेच्यावर विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारा पर्यवेक्षक परीक्षा केंद्र सांभाळत आहेत. केंद्रप्रमुख प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्रा.डॉ.एम.एस.वाघ, संयोजक प्रा.पराग पाटील, बहिस्थ पर्यवेक्षक प्रा. के.वाय. देवरे, सहाय्यक पर्यवेक्षक प्रा. किरण पाटील, प्रा. राजेंद्र गुजराथी काम बघत आहेत. परीक्षा सुरळीत सुरू असून नुकतीच परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने भेट दिली आहे.