जनकल्याण फाऊंडेशनच्या योगदानातून भानुबेन शहा गोशाळेचा उपक्रम…
अमळनेर:- सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अमळनेर येथील श्रीमती भानुबेन बाबूलाल शहा गोशाळेने गोरगरीब विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक मदतीची परंपरा यंदाही कायम ठेवली असून यंदा मुंबई येथील जनकल्याण फाऊंडेशनच्या योगदानातून तालुक्यातील तब्बल ९८० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
सदर साहित्य प्राप्त करणारे विद्यार्थी प्रचंड आनंदित झाले होते. अमळनेर तालुक्यातील खोकरपाट, तांदळी, नीम, लडगाव, वाकतुकी, हिंगोणे खुर्द, जवखेडा, खेडी, आमोदे, मुंगसे जि.प. शाळा, श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा, प्रताप हायस्कूल अमळनेर, नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब, अनिल अंबर प्राथमिक शाळा, चौधरी हायस्कूल शिरसाळे, न.पा. प्राथमिक शाळा क्र. १०, गोशाळा परिसरातील ताडेपुरा, शनिपेठ व वाडी चौक येथील जवळपास ९८० गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना जनकल्याण फाऊंडेशन मुंबई व भानुबेन बाबूलाल शहा गोशाळेमार्फत हे शैक्षणिक साहित्य नुकतेच वाटप करण्यात आले. यात एक स्कूल बॅग, भौमितिक कंपास पेटी, प्रत्येकी सहा पेन, दोन पेन्सील, सरासरी आठ वह्या, पाणी बॉटल, शैक्षणिक पॅड, लंच बॉक्स, पायमोजे व बेल्ट इ. वस्तूंचा समावेश होता.गोशाळेत रविवारी झालेल्या या कार्यक्रमात बदत्त मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशास्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. गोशाळा जनकल्याण गृप मुंबई यांच्या मदतीने मागील चार वर्षांपासून तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जात असल्याची माहिती दिली. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पो. कॉ. शरद पाटील, अमळनेर येथील उद्योजक तथा महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद्र पारख,जेष्ठ व्यापारी विनेशचंद्र पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रकाशचंद पारेख यांनी दिला वॉटर कुलर दिला भेट….
प्रकाशचंद्र पारख यांनी गोशाळेत येणारे विद्यार्थी व इतर लोकांना शुद्ध आणि थंड पाण्याचा मोठा वॉटर कुलर भेट दिल्याने याचे लोकार्पण डीवायएसपी नंदवाळकर,पोलीस निरीक्षक विजय शिंदे,प्रकाशचंद्र पारेख, प्रतिभा शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पारेख परिवाराचे सर्व सदस्य आणि श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.सदर योगदानाबद्दल चेतन शहा यांनी पारेख परिवाराचे आभार व्यक्त केले.
यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थांना शीतपेय व जेवणाची गोशाळेतर्फे व्यवस्था करण्यात आली होती. अमळनेर तालुक्यात चेतन शहा हा उपक्रम यशस्वीपणे व चांगल्या पद्धतीने राबवतात म्हणून त्यांचे जनकल्याण गृपच्या अध्यक्षा हर्षाबिन सावला यांचेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. जनकल्याण गृपच्या अध्यक्षा हर्षाबिन सावला यांनी शेकडो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचाही दत्त विद्या मंदिर शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनकल्याण गृपच्या सदस्या जागृती कोठारी, हेतल गाला, निराली कोठारी, जिनल शहा, गोशाळेचे मीना शहा, चेतन सोनार, वीरेंद्र चुणीलाल शाह,गौतम मोरे,सतीश वाणी, विक्रम पाटील, अशोक ईसे आदी उपस्थित होते. प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पी. बी. पाटील, के. जी. कोळी, पातोंडा येथील मुख्याध्यापक प्रदीप शिंगाणे, शिक्षक प्रदीप लोहारे, महेंद्र पाटील, ललित पवार, चेतन पवार, भरत मोरे, प्रा. भूषण बिरारी, छाया संदानशिव, सुनंदा पारधी तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य लाभले तर श्री शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप, गोमाता 56 भोग ग्रुप,गोशाळेचे विश्वस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांनीही परिश्रम घेतले. सहकार्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.