पतंग उडवत डी.जे.च्या तालावर घेतला नाचण्याचा आनंद…
अमळनेर:- येथील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदा कॉलनी श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक बाळ गोपाळ मंडळींसाठी खास मकर संक्रांती निमीत्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटिल व सौ. स्वप्ना पाटील यांना प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता. त्यात सर्वांनी जोश पुर्ण पतंग उडवून डी. जे. च्या तालावर नाचत आनंद घेतला.
सदर कार्यक्रमात प्रताप कॉलेज प्राचार्य पदी डॉ. एम. एस. वाघ, विद्यापीठ गणित अभ्यास मंडळावर सौ. नलिनी ईश्वर पाटील तसेच कृषी कर्मचारी सह. पतसंस्थेत संचालक पदावर दिपक अशोक चौधरी यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचे विठ्ठल मूर्ती व बुके देवून सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर मधुकर सैंदाने, मधुकर सोनवणे, मनोहर महाजन, दिलिप ठाकुर, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, पांडुरंग महाजन, राजाराम बडगुजर, कैलास महाजन, कैलास सोनार, रणजित पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, कैलास पाटील, प्रमोद सोनार, अरुण पाटील, शरद पाटील, श्याम साळी, प्रवीण ठाकुर, गणेश सोनवणे, शिवम पवार, गणेश बारी, भुषण महाजन, पंकज वाघ, भैय्या पाटिल, बंटी पाटील, भटू सैंदाणे, जगदीश सोनार, अशोक पाटील सागर शेटे, कमलेश बोरसे, राजेश परदेशी, राकेश शेटे, सैनिक शिवाजीराव पाटील, नितेश चव्हाण, हितेश बारी, जयेश बडगुजर, समाधान पाटिल, समाधान नाथबुवा यासह मोठ्या संख्येने बाळ गोपाळ, महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्रसंचालन प्रकाश महाजन यांनी केले तर कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे आभार स्वप्ना विक्रांत पाटील यांनी मानले.