निम येथील शेतकऱ्यास आर्थिक मदत करण्याचे ग्रामस्थांनी केले आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील रोहिदास रामसिंग चौधरी यांच्या शेतात असलेल्या विजेच्या खांबाला ताण दिलेल्या तारेला बैलाचा स्पर्श होताच शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला असून शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील शेतकरी रोहिदास रामसिंग चौधरी हे त्यांच्या शेतात कापूस या पिकाची वखरणी करीत होते. वखरणी करीत असताना त्यांचा शेतात असलेल्या विजेचा खांबाला ताण दिलेल्या तारेला बैलाचा स्पर्श झाल्याने बैलाला विजेचा जोरदार शॉक लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी रोहिदास रामसिंग चौधरी हे देखील विजेचा शॉक बसल्यामुळे दूरवर फेकले गेले. व किरकोळ जखमी झाल्याने कळमसरे येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. वखरणी करीत असताना वखर हा लाकडाचा असल्याने दुसरा बैल व शेतकरी बचावले. सदर शेतकऱ्याने दुसऱ्याचा बैल शेताच्या कामासाठी एका दिवसासाठी मागवला होता. इलेक्ट्रिकल खांबावरील चिनिचे ईन्सुलिटर पंचर झाल्याने ताण दिलेल्या खांबावरील तारेत विजेचा प्रवाह शिरला असावा, असे सांगितले जात आहे. कळमसरे सबसटेशन मधील वायरमन यांनी लागलीच त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला तरी शेतकऱ्याची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून त्याची परिस्थिती पाहता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यास आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी मागणी निम येथील शेतकरी मंडळी करीत आहे.
ह्या बातम्या देखील वाचा
December 22, 2024