
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ग्रामसेवकास लाचप्रकरणी काल न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वीटभट्टीसाठी ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २७ हजार ५०० रुपये लागतील असे सांगून तडजोडीअंती 25 हजारांची लाच स्वीकारताना तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने पकडले होते. काल दिनांक २४ रोजी अमळनेर न्यायालयात निम येथील ग्रामसेवक आर एल पाटील यांना हजर केले असता जिल्हा न्यायाधीश एस बी गायधनी यांनी त्यांना अधिक चौकशीसाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याकामी सरकारी वकील किशोर आर बागुल यांनी युक्तिवाद केला तसेच एसीबीचे अधिकारी शशिकांत पाटील यांनी देखील न्यायालयात युक्तिवाद केला.







