
अज्ञात चोरट्यांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील बीएसएनएल टॉवरवरून ४७ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी मारवड पोलीसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.
दिनांक १८ रोजी कळमसरे येथील बीएसएनएल टॉवरचे बीटीएस उपकरण बंद पडल्याने सेवा ठप्प झाली होती असे कर्मचारी यांनी सांगितल्यावर टेक्निशियन शिरीष पांडुरंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर ९ हजार १६ रुपयांचे पाच किलो वजनाची दोन नग टीआरइ कार्ड, १७ हजार ५०० रुपयांचे पांच किलो वजनाची दोन टिजिटी कार्ड आणि २० हजार रुपयांचे ६ किलो वजनाची तीन कम्बाईनर कार्ड असे एकूण ४६ हजार ५६० रुपये किमतीचे ७ कनेक्टिंग कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अमळनेर उप मंडळ विभागाचे अभियंता पंकज भगवान रायसिंगानी यांनी दिल्यावरून मारवड पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे करीत आहेत.




