
अमळनेर:- येथील रहिवाशी प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई या प्रथितयश आंतराष्ट्रीय संस्थेच्या एक्स्पर्ट ब्रँड अँबेसेडर या प्रतिष्ठेच्या पदावर निवड करण्यात आली आहे.
आय ट्रिपल ई संस्थेतर्फे ब्रँड अँबेसेडर पदासाठी त्रिस्तरीय निवड मूल्यांकन पद्धतीने अमलात आणली. २०२० पासून प्रथम मूलभूत मूल्यांकनात यशस्वी ब्रँड अँबेसेडरना द्बितीय स्तरावरील मध्यवर्ती मूल्यांकन अन निष्णात तज्ज्ञ ब्रँड अँबेसेडर साठीची तृतीय स्तरावरील मूल्यांकन आंतरराष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन द्वारे यशस्वी उमेदवारांची निवड आय ट्रिपल ई ब्रँड अँबेसेडर प्रोग्रामच्या संचालक दैवी पटेल यांनी केली. फेरीबाद पद्दतीने घेतलेल्या मूल्यांकन स्पर्धेत काही निवडक ब्रँड अँबेसेडरनाच एक्स्पर्ट ब्रँड अँबेसेडरपद प्रदान करण्यात आले आहे. प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी २०२०, २०२१ आणि २०२२ सलग तिन्ही वर्षे सदर निवड स्पर्धेत सुयश संपादित करत प्रथितयश निष्णात तज्ज्ञ ब्रँड अँबेसेडरपद कुठल्याही फेरीत बाद न होता प्राप्त केले आहे. आय ट्रिपल ई ही अभियांत्रिकी तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आंतराष्ट्रीय संस्था असून जगभरात त्यांचे सुमारे ४५०००० प्रोफेशनल सदस्य असून ३९ सोसायटीज, तंत्रज्ञान समिती व इतर कौन्सिल्स आहेत. संस्थेचे जगभरात १० विभाग व शेकडो सेक्शन्स आहेत अन स्टॅन्डर्सड्स विकसनातील सर्वोच्च व अग्रगण्य संस्था असून अनेक नामवंत शास्त्रज्ञ या संस्थचे क्रियाशील सदस्य व मानद सदस्य आहेत. प्रा. शशिकांत पाटील या संस्थेचे सिनिअर मेंबर असून गेल्या १३ वर्षांपासून क्रियाशील सदस्य म्हणून संस्थेच्या विविध सोसायटीज व उपक्रम यांच्या माध्यमातून विविध पदांवर स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवी सदस्य पासून प्रतिष्ठेच्या कमिटीजवर कार्यरत आहेत. प्रा. शशिकांत पाटील हे तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवाशी असून कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन उद्योजकता, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागात सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस. बी. पाटील यांचे चिरंजीव असून पत्रकार चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.




