बोहरा येथील घटना, पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार…
अमळनेर:- मागील वादातून एकाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीसात दोंघाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोहरा येथील रामकृष्ण साहेबराव धनगर व सुजित दिलीप कोळी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानतंर दिनांक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता रामकृष्ण हा किराणा दुकानात जात असताना सुजित कोळी व त्याचा भाचा आकाश कोळी (रा. जळगाव) हे शिवीगाळ करू लागले. त्याचा जाब विचारला असता दोघांनी रामकृष्ण यास चापट बुक्यांनी मारण्यास सुरुवात केली. तसेच डोळ्याच्याजवळ व तोंडावर कड्याने मारहाण करण्यात आली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी येवून सोडविले असता दोघांनी रामकृष्ण यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून मारवड पोलीसात भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. सुनील तेली हे करीत आहेत.