
गोवर्धन शिवारातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन शिवारातून अज्ञात चोरट्याने २४०० मीटर लांबीची विजेची अल्युमिनियमची तार चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
महावितरणचे कनिष्ठ अभियंता किशोर सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशांत सैंदाणे हे दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता डिपी व लाईन चेक करण्यासाठी गेले असता एका सर्किटची ११ गाळ्यांची अल्युमिनियमची तार एकूण २४०० मीटर लांबीची अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची विजेची तार दिसून न आल्याने त्यांनी वरिष्ठांना कळविले. वरिष्ठांनी येवून पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने पोलवरून तार कट करून चोरुन नेल्याचे स्पष्ट झाल्याने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास पो. मुकेश साळुंखे हे करीत आहेत







