
कै. पुंडलिक बडगुजर यांचे स्मृतिदिनानिमित्त आयोजन…
अमळनेर:- शहरातील क्षत्रिय बडगुजर समाज मंगल कार्यालय येथे दि. १ मार्च रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कै. पुंडलिक सुकलाल शेठ बडगुजर यांचे स्मृतिदिनानिमित्त गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने हे भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरात मुत्रविकार, नेत्र विकार, नाक कान घसा, स्री रोग तज्ञ, अस्थी रोग तज्ञ, शल्य चिकित्सक, जनरल मेडिसिन आदी डॉक्टर उपस्थित होते. नागरिकांचा महाआरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद लाभला. सदर शिबीराचे आयोजन सदानंद पुंडलिकशेठ बडगुजर व प्रवीण पुंडलिकशेठ बडगुजर (लक्ष्मी सप्लायर्स) यांनी केले होते, तर क्षत्रिय बडगुजर समाज कार्यकारणीचे सहकार्य लाभले. यात घनशाम मांडळकर, दिनेश मांडळकर, कैलास बडगुजर, जगन्नाथशेठ बडगुजर, शुभम बडगुजर, प्रभुदास शेठ बडगुजर, गिरीष बडगुजर, उज्वल बडगुजर, विशाल बडगुजर व लक्ष्मी सप्लायर्स स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले.







