शिंदखेडा:- तालुक्यातील भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेला जिल्हास्तरावर परस बाग स्पर्धेत, दुसरा क्रमांक मिळाला आहे
तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावल्याने गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे, केंद्रप्रमुख जगदीश पाटील यांनी कौतुक केले आहे. उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा भडणे या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्ह्यात संयुक्त दुसरा क्रमांक मिळाला आहे. शिक्षक व शाळेतील मुलांनी स्वतः शाळेत परसबाग तयार करून लागणारे पालेभाज्या स्वतः तयार करून, दररोज भाजीपाला उपयोगी येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शेतीविषयक शिक्षण मिळत आहे. अधिकारी यांनी वेळोवेळी भेट देऊन चर्चा व उपक्रमाचे कौतुक केले आहे. शाळेतील शिक्षक रवींद्र बोरसे यांना 26 जानेवारी रोजी उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन शाळेत शंभर टक्के विद्यार्थी शाळा बाहेरील,मुलांना उपस्थित केल्याबद्दल त्यांचे मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भडणे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या उत्कृष्ट व्यवस्थापन व शिक्षक वृंद यांच्यामुळे लोकसहभागातून, शाळेचा चेहरा बदलला आहे. यासाठी भडणे येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामराव पाटील, उपाध्यक्ष देविदास कोळी व सदस्य, लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील, उपसरपंच भाऊसाहेब निकम, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी आणि सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. मुख्याध्यापक सुधीर मोरे, उपशिक्षक माधवराव पाटील, सूरज गिरासे, श्रीमती सीमा चव्हाण, लता पाटील, रेखा कोळी व सर्व स्टाफचे कौतुक करण्यात येत आहे.