लायन्स क्लबच्या आवाहनाला कुटुंबीयांनी दिला प्रतिसाद…
अमळनेर:- येथील लायन्स क्लब च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील दोघांनी मरणोत्तर संकल्प पूर्ण करत नेत्रदान केले असून, यामुळे नेत्रदान चळवळीला पुन्हा गती मिळणार आहे. लायन्सच्या या उपक्रमामुळे दोन गरजूंना दृष्टी मिळणार आहे.
शहरातील न्यू प्लॉट भागातील गिरीश कोठारी यांच्या आई स्व.शोभा बेन जयेश कोठारी यांचे २८ फेब्रुवारी रोजी निधन झाले तर ०३ मार्च रोजी शहरातील सैनानी नगर भागातील हरीशशेठ सैनानी यांचे निधन झाले. सैनानी व कोठारी परिवाराने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करत नेत्रदान करण्यात आले आहे.
लायन्स क्लब अमळनेर आपल्या सेवाभावी, समाजोपयोगी तसेच लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत आला आहे. त्यातच आरोग्य क्षेत्रात लायन्सचे कार्य उल्लेखनीय आहे.याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब तर्फे नेत्रदानाची चळवळ हाती घेण्यात आलेली असून,कोविड च्या काळात मंदावलेली नेत्रदानाची संकल्पना पुन्हा एकदा गती घेणार असल्याचे लायन्स चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी सांगितले. लायन्सच्या या उपक्रमामुळे अनेक गरजूंना दृष्टी प्राप्त होणार आहे. मरणोत्तर नेत्रदानाच्या संकल्पनेमुळे आपल्या डोळ्यांनी अजून कुणी तरी जग पाहू शकेल हाच हेतू ठेऊन लायन्स क्लबने दात्यांना नेत्रदानाचे आवाहन केले आहे. यावेळी लायन्स क्लब अमळनेर तर्फे नेत्ररोग तज्ञ डॉ.राहुल मुठे, डॉ.नरेंद्र महाजन, डॉ.मिलिंद नवसारीकर,डॉ.संदीप जोशी,प्रेसिडेंट योगेश मुंदडे, अनिल रायसोनी,महावीर पहाडे, येझदी भरुचा,प्रशांत सिंघवी, प्रदीप जैन, जितेंद्र पारख,अजय हिंदुजा, प्रेम सैनानी यांनी सहकार्य केले.