ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकूसह स्पर्धां संपन्न, बक्षिसांचे केले वितरण…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे कै. भालेराव रामभाऊ पाटील ज्युनियर सायन्स कॉलेज मारवड व परेश यशवंतराव शिंदे यांच्या साईप्रसाद ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनानिमित्त मारवड, गोवर्धन, बोरगाव परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकूसह सामूहिक स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या सौ.यामिनी भूषण साळुंखे यांना पैठणी साडी, द्वितीय क्रमांक विजेत्या शोभा नंदकिशोर शिंदे यांना बनारसी साडी, तृतीय क्रमांक विजेत्या पुष्पाबाई माधवराव साळुंखे यांना कॉटन साडी देण्यात आली. यावेळी चतुर्थ बक्षीस स्व.वैशाली चव्हाण प्रतिष्ठान यांच्याकडून सौ.वैशाली भूषण साळुंखे यांना देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून उर्मिला प्रभाकर साळुंखे, कोमल तेजस साळुंखे यांना देण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना आयोजकांमार्फत भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजया भिकनराव पाटील, (उपाध्यक्ष कै.बि. आर .पाटील ज्युनियर कॉलेज), लोकनियुक्त सरपंच आशा सुभाष भील, प्रमुख पाहुणे म्हणून भारती यशवंतराव शिंदे, अतिथी म्हणून वैष्णवी परेश शिंदे, जयश्री हर्षल पाटील, प्रियंका हेमंकात पाटील, ग्रामपंचायत सदस्या उज्वला पाटील, कविता चौधरी, शितल पाटील, रजनी राकेश गुरव, इत्यादी सर्व महिला उपस्थित होते. कै. भालेराव रामभाऊ पाटील सायन्स ज्युनिअर कॉलेज मारवडचे संस्थापक अध्यक्ष व उपसरपंच भिकन भालेराव पाटील व साईप्रसाद ग्रुपचे संचालक परेश यशवंतराव शिंदे यांनी विजेत्या महिला स्पर्धकांचा सत्कार केला. यावेळी हर्षल भिकनराव पाटील, हेमकांत भिकनराव पाटील, दीपक पाटील, शांताराम साळुंखे, मारवडकर सर, शुभम सोनवणे, प्रमोद पाटील , कुणाल पाटील , बापू चौधरी, डॉ. विलास पाटील नरेंद्र पाटील, स्व.वैशाली चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप राजाराम चव्हाण, गौरव शिंदे सुरज जाधव , सुभाष भील, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जीवन मोरे, प्रास्ताविक मीना मॅडम, कुणाल सर यांनी मांडले. आभार प्रदर्शन वैष्णवी परेश शिंदे यांनी केले.या निमित्ताने मारवड, गोवर्धन, बोरगाव परिसरातील सर्व महिला भगिनींनी सामूहिक स्पर्धेत भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना आयोजकांमार्फत भेटवस्तू देण्यात आली.