साने गुरुजी कन्या शाळेतील शिक्षिकेचा उपक्रम….
अमळनेर:- येथील साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथील उपक्रमशिल शिक्षिका मोनाली योगेश वंजारी यांनी नववीच्या मुलींना केशभूषेचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी शिक्षिका मोनाली योगेश वंजारी यांनी महत्त्व समजावून सांगताना सांगितले की, केशभूषेचे मुख्य उद्देश म्हणजे आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणे हे होय. केशभूषेचा सामाजिक उद्देश म्हणजेच सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक केशभूषा करणे हे होय. या अंतर्गत असणाऱ्या गोष्टी म्हणजेच केस कापणे, केस धुणे, केस नीट करणे, केस विंचरणे, केस कुरळे करणे, केस सरळ करणे, केसाला कलर लावणे इत्यादी होय. आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखविण्याकरिता त्यात विजयचिन्हे व पदके लावत यातून केशभूषेचा उगम झाला असा समज आहे. भारतीयांचे सौंदर्याचे प्रतीक हे योग्य केशभूषा हे होय. अशाप्रकारे शिक्षिका वंजारी यांनी विद्यार्थिनींना जीवनात केशभूषेचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगत अनोखा उपक्रम राबविला.