पातोंडा ता.अमळनेर:- येथील श्री दत्त विद्या मंदिर शाळेचा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा बारावीचा निकाल 97.60 व दहावीचा निकाल 96.40 इतका लागला. याप्रसंगी दहावी व बारावीला शाळेतून प्रथम गुणाक्रमाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. बारावीत रोहिणी पवार (78), दिपाली गावंडे (77.83), जोत्सना बोरसे (77.83), ऐश्वर्या महाले (77.33), पुनम पाटील (76.86), हर्षाली सोनवणे (76.16) तर दहावीत कुणाल पवार (89.20), माधूरी बिरारी (88), प्रतिक कुंभार (87.80), पुजा शिंदे (87.40) , कल्पेश भदाणे (87.20) हे विद्यार्थी शाळेत एक ते पाच गुणानूक्रमे उत्तीर्ण झाले. दहावीची विद्यार्थीनी माधूरी बिरारी हिला विज्ञान विषयात 97 गुण तर बारावीची विद्यार्थीनी जोत्सना बोरसे हिला संरक्षण विषयात 91 गुण मिळवल्याने त्यांचे व विज्ञान शिक्षक महेंद्र पाटील यांचे विशेष कौतूक करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रदिप शिंगाणे , पर्यवेक्षक व्हि सी पाटील, उपशिक्षक डि के पाटील, शरद सोनवणे, प्रदिप लोहारे, भरत मोरे, महेंद्र पाटील, भुषण बिरारी , ललित पवार , अमित पवार, छाया संदानशिव, सुनंदा पारधी, लिपीक राजन बिरारी, ग्रंथपाल प्रमोद साळुंखे, शिपाई अनिल बिरारी , राजेंद्र संदानशिव व किशोर पाटील आदी उपस्थित होते.