अमळनेर : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटूंब व्यवस्थेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे एकत्रित कुटुंबात असलेल्या सर्वाचा सर्वागिण विकास तर होतोच पण महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता असते तसेच महिला आपल्या कुटुंब व्यवस्थेचा प्रमुख आधार असतात. आधुनिक युगातील साधन सुविधांच्या वापर करून बदलांना आत्मसात करत महिलांनी स्वत:चा विकास साधला पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार स्मिता वाघ यांनी केले.
दिनांक ८ मार्च महिला दिनानिमित्त प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर तर्फे तालुक्यातील गरीब विधवा परितक्त्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. श्रध्दा वानखेडे, श्रीमती गीताबाई गुमन कोळी, किर्ती कोठारी, जे. के. चौधरी, डॉ. अंजली चव्हाण, डॉ. अर्चना पाटील, सौ.मेहराज बोहरी, सौ. रुपाली भावसार, राजेंद्र निकुंभ, संजय वाणी, सौ स्मिता चंद्रात्रे व प्रमुख सत्कारमुर्ती हजर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप तत्वज्ञान केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. राधिका पाठक यांनी केले. प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून श्रीमती गीताबाई गुमन कोळी, श्रीमती संगीता योगेशकुमार जोशी, श्रीमती सीमा विनायक सैंदाणे, श्रीमती ललिता राजेंद्र कोळी, श्रीमती कल्पना यशवंत पाटील, श्रीमती सीमा अशोक माने, श्रीमती सरला सुरेश बोरसे, श्रीमती पल्लवी अहिरे, श्रीमती सुशिलाबाई दिलीप ठाकरे, श्रीमती प्रिया विजय पोतदार, श्रीमती सुवर्णा रायगडे, तसेच तत्त्वज्ञान केंद्रातील प्रा.डॉ. राधिका पाठक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. रुपाली कपिल भावसार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पार्लरमध्ये महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र राहून गेले होते. त्यांनी त्यांचा शोध घेऊन घरी जाऊन मंगळसूत्र परत केले. प्रा.धर्मसिंह पाटील, डॉ. अंजली चव्हाण, मेहराज बोहरी, रूपाली भावसार, प्रा.डॉ. अर्चना पाटील यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा रायगडे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले.
कार्यक्रमास केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार,सल्लागार समिती सदस्य प्रा. डी. डी. पाटील, प्रा.धीरज वैष्णव, प्रशासकीय अधिकारी रोहिदास साळुंके, प्रा.दिनेश हालोर, पंडित नाईक, गोपाल महाजन, राजू पाटील, उमेश अहिरराव, कमलेश बोरसे, बापू पाटील,गिरीश चौधरी, महावीर मोरे, इनुस मेहतर आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.