तालुक्यातील विविध संघटनांनी निवेदनाद्वारे दिला संपाचा इशारा…
अमळनेर:- जुनी पेन्शन योजनेसाठी तालुक्यातील विविध शाळा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी १४ पासून संपावर उतरत असून निवेदनाद्वारे त्यांनी संपाचा इशारा दिला आहे.
शिक्षक संघटनेचे संदीप घोरपडे, तुषार बोरसे, मधुकर चौधरी, कुणाल पवार, प्रकाश पाटील, संजय पाटील, एम ए पाटील, आर जे पाटील, कुणाल पवार, प्रभूदास पाटील, ईश्वर महाजन, सुनील वाघ, आशिष पवार, निलेश विसपुते, आरोग्य विभागाचे डॉ गिरीश गोसावी, किशोर माळी, अविनाश चव्हाण, प्रमोद पाटील, पंचायत समितीचे जितेंद्र पवार,के टी पाटील, बी जे बाविस्कर, मिलन शिंपी, अनिल पाटील,एल डी चिंचोरे, आशा ठाकूर, नगरपालिकेचे प्रसाद शर्मा, सोमचंद संदानशीव, महेश जोशी, अनिल बॅंडवाल, किशोर संघेले, राधा नेतले, अविनाश संदानशीव, बिंदू सोनवणे, पाकिजा पिंजारी, दीपाली पवार ललिता गवळी, रुपाली पवार, सीमा पाटील, गायत्री पाटील, मनीषा गवते, मंगला पाटील, रत्नमाला चौधरी, माधवी निकम यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार संतोष बावणे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन संपाचा इशारा दिला आहे.