
अमळनेर:- प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या उभारणीस व विकासात गुरुवर्य रानडे यांच्या मोलाचा वाटा होता. सुरुवातीच्या काळात गुरुदेव रानडे हे ८ दिवसांसाठी वास्तव्यास आले होते. तत्त्वज्ञान केंद्राच्या आरंभीस प्रताप तत्त्वज्ञान फेलोजची निवड केली. तसेच प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचा लायब्ररीसाठी आवश्यक पुस्तकांची यादी करून मागविण्यात आली, असे प्रतिपादन पुणे स्थित गुरुदेव रानडे यांचे अनुयायी शरद जोशी यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी शरद जोशी यांचा भगिनी सौ. विद्या उपासनी यांचेही यथोचीत मनोगत झाले. शरद जोशी व सौ.विद्या उपासनी यांचातर्फे गुरुदेव रानडे यांचे इंग्रजी भाषेतील 17 पुस्तके, हिंदी 2 व मराठी १ व साहित्य ग्रंथ प्रताप तत्त्वज्ञान केंद्रास भेट स्वरूपात दिल्या.
या प्रसंगी प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा. दिलीप भावसार, कार्याध्यक्ष प्रा. सुधिर पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एस. वाघ, सल्लागार समितीचे सदस्य दिनेश नाईक, प्रशासकीय अधिकारी रोहिदास साळुंखे, पंडीत नाईक, गोपाल महाजन, उमेश आहिरराव, बापु पाटील, राजु पाटील, गिरीश चौधरी, कमलेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुवर्णा रायगडे यांनी केले.







