
शेतकऱ्याच्या घरातून ६२ हजाराचा ऐवज केला लंपास..
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथे अज्ञात चोरट्याने घरात घुसून ६२ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक १५ रोजी घडली आहे.
शिरसाळे येथील शेतकरी भटू शिवदास पाटील हे दिनांक १५ रोजी शेतात गेले असता सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात घुसून गोदरेज कपाटातील लॉकर मधून ५० हजार रुपये रोख, १२ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे ऐवज असा एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यावरून मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. भरत श्रीराम इशी हे करीत आहेत.







