
२७ मार्चला नामनिर्देशन पत्र होणार दाखल…
अमळनेर:- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडून निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेण्याचे आदेश पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर पी एल खंटागळे यांनी २१ मार्च रोजी जारी करण्यात आले असून दिनांक २७ रोजी निवडणूक कार्यक्रमानुसार २७ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रिया सुरू होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
दिनांक २७ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतच दिनांक २७ ते ३ एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे, दिनांक ५ एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी होईल, ६ एप्रिल रोजी छाननीत वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल,दिनांक ६ ते २० एप्रिल पर्यंत उमेदवार मागे घेता येईल,२१ एप्रिल रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी करून चिन्ह वाटप केले जाईल. वर्गवारी केल्या प्रमाणे २८ एप्रिल रोजी असे मतदान होवून तीन दिवसांनी मतमोजणी होऊन होऊन निकाल जाहीर केला जाईल असा निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात आला आहे . यामुळे आतापासूनच बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत







