
बँकेतून बोलत असल्याचे सांगत केली फसवणूक…
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील शेतकऱ्यास ओटीपी मागून ५९ हजाराचा चुना लावणाऱ्या विरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील सुनील शिवाजी पाटील यांना डिसेंबर महिन्यात ८९१८४५८१२० या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी बँकेतून बोलत आहे असे खोटे सांगत ओटीपी घेवून फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवर ५९४४९ रुपयांची ऑनलाइन खरेदी केली. त्यावरून मारवड पोलीसात भादवि कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ डी व सी अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. विजय शिंदे हे करीत आहेत.







