अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर शिवारातील विहिरीत अनोळखी इसमाचा प्रेत तरंगत असल्याचे दिनांक २२ रोजी आढळून आले असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गलवाडे येथील गजानन हेमराज पाटील यांचे जैतपीर शिवारात शेत असून दिनांक २२ रोजी सकाळी १०:३० वाजता ते पाणी पाहण्यासाठी गेले असता अनोळखी पुरुष जातीचे प्रेत (वय अंदाजे ४० ते ४५) पालथे तरंगताना दिसून आले. त्यामुळे पोलीस पाटील यांना सांगितल्याने पोलीस पाटील गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सफौ किशोर पाटील हे करीत आहेत.