पोलिसांत दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील पायी जाणाऱ्या एकास दुचाकीस्वाराने धडक दिल्याने जखमी झाल्याची घटना दिनांक २३ रोजी घडली असून यात दुचाकीस्वार ही जखमी झाला असून दोघांवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २३ रोजी सायंकाळी कळमसरे येथील किशोर गोलीदास भील हा पायी धार गावाकडून मारवडकडे पायी जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वार राजेशकुमार घनशामदास टाक याने मागून येत धडक दिल्याने किशोर व राजेशकुमार हे फेकले गेल्याने दोन्ही जखमी झाले. त्या दोघांना गावातील रिक्षा चालक कैलास बडगुजर याने दवाखान्यात दाखल केले व घटनेची माहिती किशोरच्या कुटुंबियांना दिली. किशोर याच्यावर हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचार सुरू असून राजेशकुमार याच्यावर ही धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती असून किशोरचा चुलत भाऊ संजय ठाकरे याने दुचाकीस्वार राजेशकुमार याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पुढील तपास पो.ना. सुनील तेली करीत आहेत