
१३६ वर्षांची अखंडित परंपरा, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने…
संदीप लोहार
पातोंडा ता.अमळनेर– येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांगणात, सालाबादप्रमाणे १३६ वर्षांपासुन चालत असलेला श्री रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत अखंडपणे ज्ञानयज्ञ हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळा दि.३० मार्च ते दि.६ एप्रिल चैत्र शुद्ध पौर्णिमा या सुमंगल कालावधीत संपन्न होत आहे.

या कालावधीत नित्यनेम सकाळी काकडा आरती, सायंकाळी हरिपाठ व रात्री सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था देवाची आळंदी येथील सुप्रसिद्ध नामवंत अशा किर्तनकारांचा किर्तनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि.३० मार्च ह.भ.प.संदीपजी महाराज येवले (अभियंता नाशिक), शुक्रवार दि.३१ रोजी ह.भ.प. संजय सिंगजी महाराज राजपूत (संतवागमय संशोधन विभाग आळंदी) शनिवार दि.१ एप्रिल रोजी ह.भ.प. रविंद्रजी महाराज हरणे (मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर) रविवार दि.२ रोजी ह.भ.प.चकोरजी महाराज बाविस्कर (न्यायाधीश नाशिक) सोमवार दि.३ रोजी ह.भ.प. रामेश्वरजी महाराज शास्त्री (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ) मंगळवार दि.४ रोजी ह.भ.प.हरिदासजी महाराज (देहुकरफड श्री क्षेत्र पंढरपूर), बुधवार दि.५ रोजी हभप. गजाननजी महाराज पवार (आळंदी देवाची) गुरुवार दि.६ रोजी हभप.सदाशिवजी महाराज साकळीकर(अध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ खान्देश) यांचे कीर्तन होणार आहे. या सप्ताह कालावधीत श्री रामनवमी व हनुमान जयंती उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर कार्यक्रमांचे आयोजन हभप. श्री दत्त भजनी मंडळ व श्री दक्षिणमुखी हनुमान मंडळ यांनी केले आहे.त्यांना सेवेकरी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे.भाविक भक्तांनी या ज्ञान अमृताचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.