सर्व सहभागींना पर्यावरण रक्षणाची दिली शपथ…
अमळनेर:- २९ मार्च रोजी नगर परिषदेच्यावतीने स्वच्छतोत्सव २०२३ अंतर्गत अभियान राबवले जात आहे. यात महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व नेतृत्व वाढवण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी द्रौ.रा.कन्या शाळेच्या विद्यार्थिनी, नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी, महिला बचत गट, महिला होऊसिंग ट्रस्ट, सेवाभावी संस्था उपस्थित होत्या. रॅलीत सहभागी सर्व नगरपरिषदेत एकत्रित आले होते. त्यावेळी सर्व सहभागींना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. त्यानंतर रॅली नगरपरिषदेतून सुभाष चौक, आठवडे बाजार मार्गे तिरंगा चौक येथे आली. रॅलीत सर्वांनी प्लास्टिक बंदी,ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, पर्यावरण रक्षण करण्यासाठीच्या घोषणा दिल्या. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, द्रौ रा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रॅलीत प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, हैबतराव पाटील, युवराज चव्हाण, समन्वयक गौतम बिऱ्हाडे, युनूस शेख,विजय सपकाळे, एनयुएलएमचे चंद्रकांत मुसळे, तुकाराम भोई, उज्वला पाटील, युवराज चव्हाण, अनिल बाविस्कर,अनिल बेंडवाल, कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक बी.एस. पाटील, पर्यवेक्षक विनोद कदम शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. रॅली मध्ये द्रौ.रा.कन्या शाळेच्या विद्यार्थिनींचा उत्साह दिसत होता.