चार दिवसांपूर्वी महिलेची साखळी खेचून झाले होते फरार…
अमळनेर:- चार दिवसांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागातून महिलेची साखळी खेचून फरार झालेल्या सोनसाखळी चोरांना अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दि. २८ मार्च रोजी सांयकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी वंदना गणेश पाटील ह्या महाराणा प्रताप चौका कडुन रेल्वे स्टेशन रोडाकडे पायी चालत असतांना लोकसेवा झेरॉक्स समोरुन दोन अज्ञात इसम काळ्या रंगाचे मोटर सायकलने विरुध्द दिशेने येवुन मोटर सायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील ०३ ग्रॅम वजानाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावुन नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यांतील आरोपीचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे मार्गदर्शनात शोध सुरु असतां त्यांनी गुन्ह्यांतील फिर्यादी व साक्षीदार यांचे कडुन नमुद इसामांचे वर्णन समजुन घेतले व त्यावरुन अश्याप्रकारच्या गुन्हे करणारे कार्यपध्दती असलेल्या अमळनेर हद्दीतील व धुळे शहरातील गुन्हेगांराची माहीती संकलित करुन त्यांचे फोटो प्राप्त करण्याच्या सुचना तपास पथकांना दिल्या. त्यावरुन तपास पथकांने प्राप्त केलेल्या २० ते २५ गुन्हेगाराच्या माहीतीपैकी केवळ ०५ ते ०६ गुन्हेगार यांचे शाररीक वर्णन व गुन्हे कार्यपध्दती जुळुन आली व जुळुन आलेल्या ०५ ते ०६ गुन्हेगारांच्या मागील काही दिवसांच्या संशयित हालचालींची माहीती प्राप्त करण्या करीता गोपनिय सुत्राधार यांना कळविण्यात आले. त्यावरुन अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चिमणपुरी पिंपळे बु. गावातील इसम नामे शिवाजी निंबा चौधरी याच्यावर अधिक संशय बळावला व तपास पथकाने चिमणपुरी पिंपळे बु. गावात जावुन तपास केला असता तो वर नमुद गुन्हा घडल्याचे वेळेस अमळनेर शहरात त्याचे जोडीदार बाबत येवुन गेल्याचे समजल्याने त्यांनी गुन्हा केला असल्याची खात्री झाली. त्याअनुषंगाने त्यास ताब्यात घेत विश्वासात घेवुन त्याच्या साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्यांत त्याचा धुळे येथील साथीदार सुनिल नारायण चौधरी याची माहीती दिली व त्यास देखील धुळे येथुन ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी शिवाजी निंबा चौधरी रा. चिमणपुरी पिपळे बु. ता. अमळनेर व सुनिल नारायण चौधरी रा. अलंकार सोसायटी, नटराज टाकी जवळ, धुळे यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांना गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतां कडुन अमळनेर पो.स्टे. कडील भा.द.वि. कलम ३९२, ३९२, ३४ प्रमाणे असे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडुन गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करणे, घटनास्थळाची पडताळणी करणे व इतर तपास सुरु असुन आरोपीकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने वरीष्ठ पो. नि. विजय शिंदे यांच्या सुचनेप्रमाणे पोउनि. विकास शिरोळे, सफौ बापु साळुंके, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे यांनी बजावली आहे.