विविध गुन्ह्यातील जलद तपासाबद्दल अमळनेर पोलिसांचे एसपींनी केले कौतुक…
अमळनेर:- संतूर साबणाचा ट्रक नियोजित स्थळी न पोहचविता अपहार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी अमळनेर पोलिसांचे कौतुक केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०४ जानेवारी रोजी अमळनेर शहरातील विप्रो कंपनी येथुन आरोपीनी नावे वाहनाचे क्रमांक बदलवून १८ टन १०० किलो संतुर साबण (किंमत ३३,०२,६७८ रू.) माल ट्रक मध्ये भरुन ठरल्याप्रमाणे तमकुर (कर्नाटक) येथे पोहचाविण्याकरिता ताब्यात घेवुन माल सदर ठिकाणी पोहच न करता मालाचा अपहार करुन विप्रो कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी ट्रॉन्सपोर्टचे अनिल कुमार पुनिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दि. १० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांत अनोळखी ट्रक चालक व मालक यांनी त्यांची नावे व बनावट कागदपत्र तसेच वाहनाचे ड्युप्लीकेट नंबर प्लेट बनावट कागदपत्रे ट्रॉन्सपोर्ट कडे सादर केले असल्याने त्यांचे खरे नावे व पत्ते तसेच ट्रकचा मुळ क्रमांक याबाबत काहीएक माहीती उपलब्ध नसतांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळुन आलेल्या परीस्थितीजन्य तसेच तांत्रिक पुरावे व बाहेरील राज्यातील मिळविलेला गोपनिय बातमीदारामार्फत तसेच अमळनेर ते राजस्थान पावेतो टोल नाक्यावरील मिळुन आलेल्या माहीतीनुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन सदरचे पथक सलग एक महीना राजस्थान व गुजरात राज्यात पाठवुन आरोपीबाबत माहीती गोळा करुन आरोपी जगदीश बालकिशन भार्गव यांस पथकाने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला हजर केले. पो.नि. शिंदे यांनी विचारपुस करुन त्याने त्याचे इतर सहा साथीदारासह सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्ह्यांत आतापर्यंत सात आरोपीना निष्पन्न करुन तीन आरोपिंना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन १८,५६,४००/- रु. किमतीचा ३२५ बॉक्स संतुर साबण हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येवुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी या गुन्ह्यांत वेळोवेळी उपयुक्त सुचना दिल्या आहेत. तसेच अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. सदरच्या अपहार प्रकरणी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी वेळोवेळी तपासाची माहीती व आढावा घेवुन सुचना दिल्या होत्या व तपास पथके परराज्यात पाठविण्यासाठी आदेश दिलेले होते. तसेच त्यांनी स्वतः अमळनेर पोलीस स्टेशनला भेट देवुन हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अमळनेर पोलीसांनी चैन स्नॅचिंग पाच गुन्हे उघडकीस आणले आणि पेट्रोलपंपचा बंदुकीचा धाक दाखवुन जबरी चोरी असे सर्व गुन्हे उघड करुन आरोपीना अटक केल्याबाबत व त्यातील मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत अमळनेर पोलीसांनी केलेल्या भरीव कामगिरीबाबत प्रशंसा व्यक्त केली आहे. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची भेट घेवुन त्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे असे उपस्थित होते. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सुचनेप्रमाणे व मार्गदर्शखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोउनि अनिल भुसारे, पोउनि भैय्यासाहेब देशमुख, पोहेकॉ. सुनिल हटकर, पोना. मिलींद भामरे, पोना. शरद पाटील, पोकॉ. निलेश मोरे, पोकॉ. उज्वल पाटील, पोकॉ. अमोल पाटील, पोकॉ. श्रीराम पाटील अश्यांनी सदरची कामगिरी केली आहे.