अमळनेर:- तालुक्यातील धार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने एकतर्फी बाजी मारत १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे.
गणेश धोंडू पाटील यांच्या लोकमान्य पॅनलचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून मयूर हिम्मतराव पाटील, तुळशीराम भादू पाटील, शशिकांत सखाराम पाटील, दिलीप यशवंत पाटील, भटाराम धुडकु पाटील, नाज अहमद मुजावर (बाबू पेंटर), रमेश दगडू सैदाने, ओबीसी प्रवर्गातून मिलिंद सुरेश पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून बुधागिर डीगागिर गोसावी, महिला राखीव प्रवर्गातून मनीषा भूषण पाटील, सुमनबाई मधुकर पाटील, अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातून पदमाबाई पुंडलिक सैदाणे यांनी विजय मिळवला आहे. लोकमान्य पॅनलच्या एकतर्फी विजयानंतर गावात समर्थकांनी जल्लोष करत कै. शिवदास ओंकार पाटील व कै. हिंमत शिवदास पाटील यांच्या स्मारकस्थळी येत दर्शन घेतले.