5 कोटी 59 लक्ष निधीस प्रशासकीय मान्यता, आमदारांच्या प्रयत्नांना यश…
अमळनेर:- येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर लवकरच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांतुन 5 कोटी 59 लक्ष 58 हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचे शासन आदेश नुकतेच दि 11 एप्रिल रोजी काढण्यात आले आहेत.अमळनेर न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत असून सदर न्यायालयातील वाढते कामकाज आणि वाढते खटले यामुळे ही इमारत अपुरी पडू लागली होती,त्यामुळे न्यायालयीन प्रशासनास आहे त्या जागेत कामकाज भागवावे लागत होते, सदर गरज आमदार अनिल पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन विधी व न्याय विभागाने याच इमारतीवर एक मजला बांधकाम करण्यास परवानगी दिल्याने मोठा प्रश्न सुटला आहे.
सदर इमारतीवर बांधकाम करताना बांधकाम, रेन वॉटर हार्वेस्टिंग,फर्निचर, पाणीपुरवठा आणि मलनिसारण,अंतर्गत व बाह्य विद्युत पुरवठा,अग्निशमन यंत्रणा,संरक्षण भिंत,मैदान सुशोभीकरण, वाहन तळ, भुसपाटीकरणं,सीसी ड्रेन आणि सीडी वर्क,जमिनीखालील पाण्याची टाकी,मुख्य पाण्याची टाकी, पंप हाऊस, बोअरवेल, वातानुकूलित यंत्रणा, उदवहन, अंतर्गत स्वच्छतागृह,ए बी रूम, एरिया लाईट,पंप, जनरेटर, सीसीटीव्ही इ कामे केली जाणार आहेत. एकंदरीत या निधीत अतिरिक्त मजल्यासह सुशोभीकरण आणि सुविधा देखील वाढविण्यात येणार असल्याने संपूर्ण न्यायालय परिसराचे रूपच बदलणार आहे. सदर बांधकाम मान्यता मिळविल्याने अमळनेर वकील संघाने आमदार अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले असून या मंजुरीबद्दल आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील आणि विरोधीपक्ष नेते ना अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.