पं.स. शिक्षण विभाग व तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत सन्मान…
अमळनेर:- पंचायत समिती शिक्षण विभाग व अमळनेर तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सेवनिवृत्तीवबद्दल दोन महिला अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चंद्रकांत देसले (जिप शाळा कलाली), विलास पाटील (जि प शाळा सात्री), मीना पाटील (जि प शाळा खापरखेडा),गोपाल महाजन (जिप शाळा बोहरे), सविता देशमुख (भगिनी मंडळ शाळा अमळनेर), अतुल बोरसे (आश्रम शाळा अंतुर्ली), हेमंत महाजन (जि एस हायस्कुल), भूषण महाले (लोकमान्य विद्यालय) , सुशील भदाणे (नवभारत विद्यालय दहिवद), प्रेरणा सराफ (डी आर कन्या शाळा) , आंनदा धनगर (माध्यमिक विद्यालय करणखेडा), दीपक महाजन (साने गुरुजी कन्या विद्यालय) सोनाली पाटील (जिप शाळा तासखेडा) या १३ शिक्षकांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हान आणि विस्तार अधिकारी कल्पना वाडीले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, केंद्र प्रमुख रविंद्र साळुंखे,शरद सोनवणे, अशोक सोनवणे, प्रवीण वाडीले, छगन पाटील,विश्वास महाजन ,चंद्रकांत साळुंखे, भगवान पाटील, ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक पतसंस्था संचालक तुषार बोरसे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, आर जे पाटील आदी उपस्थित होते. तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी जी एस हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक विश्वासराव पाटील यांनी मनोगत शरद सोनवणे, क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष एस के पाटील, शरद सोनवणे, एस पी चव्हाण, वाडीले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दत्ता सोनवणे, एस पी वाघ यांनी तर आभार प्रदर्शन डी ए धनगर यांनी केले.