अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथे शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
फिर्यादी छोटू मगन धनगर हे ३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस मोटर सायकल क्र. एम एच १९ बीए ८०२३ ने शेतात मका पिकास पाणी भरण्यासाठी गेले होते. मोटारसायकल ही विना चाबिने सुरू होणारी असून हॅण्डल लॉक न करता शेताचा बांधावर लावली होती. संध्याकाळी ७ वाजता परत जाण्यासाठी आले असता दुचाकी त्याठिकाणी दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता शोध न लागल्याने मारवड पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३७९ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सुनील तेली हे करीत आहेत.