
अमळनेर:- तालुक्यातील धार येथे मारवड पोलिसांनी छापा टाकत गावठी दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धार येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोउनि विनोद पाटील, पोकॉ तुषार वाघ व सहकाऱ्यांनी धार गावी भेट देत छापा टाकला असता प्रवीण काशिराम सैंदाणे हा इसम ४० लिटर गावठी दारूसह व संजय काशिराम सैंदाणे हा ५० लिटर गावठी दारुसह मिळून आल्याने त्या दोघांविरुद्ध मुं प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. पुढील तपास पो.ना. मुकेश साळुंखे व पो.ना. सुनील तेली हे करीत आहेत.







