चार आरोपींना अमळनेर पोलिसांनी केले जेरबंद…
अमळनेर:- दरोड्याच्या घटनेत अटकेत असलेल्या आरोपी सहकाऱ्याला सोडविण्यासाठी दुसरा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना शहर व परिसरात अज्ञात आरोपी हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याबाबात खात्रीशिर बातमी मिळाली होती. त्यावरुन त्यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना परीसरात सतत गस्त करणे, हॉटेल, ढाबे, लॉजेस इ. वारंवार चेक करुन तेथे येणाऱ्या जाणाऱ्या इसमांची माहीती ठेवणे अशा इतर अनेक उपयुक्त सुचना दिल्या होत्या. दि. १०/०४/२०२३ रोजीच्या रात्र गस्ती दरम्यान पोहेकॉ संजय पाटील, पोहेकॉ अरुण बागुल, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ कपिल पाटील, पोहेकॉ सुनिल पाटील, पोना योगेश पाटील, पोकॉ शेखर साळुंखे, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ जितेंद्र निकुंबे असे शहरात गस्त करीत असतांना त्यांना रात्री ०३.३० वाजेच्या सुमारास हॉटेल बलराम लगतचे कोपऱ्यात काही इसम हे अंधारात दबा धरुन बसलेले दिसले. वरील रात्रगस्तीचे अंमलदार हे जात असतांना त्यांची चाहुल लागताच ते अंधाराचा फायदा घेवुन दोन मोटर सायकल वर ०५ इसम पळुन गेले व एका इसमास जागीच पकडले. पकडलेल्या इसमांस त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव जगदीश पुंडलिक पाटील रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि. जळगांव असे सांगितले. व पळून गेलेल्या इसमांची नावे दिनेश भोई , प्रेम पाटील, अजय अंबे तिघे रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि. जळगांव, करडाणे पुर्ण नांव माहीत नाही, भटु दिलीप पाटील रा. पैलाड अमळनेर असे सांगितले. तसेच जगदीश पुंडलिक पाटील याच्या ताब्यात एक बजाज सिटी एक्स मोटर सायकल, एक धारदार चाकु, मिरची पुड, नायलॉन दोरी, लोखंडी टॉमी, मोबाईल असे साहीत्य मिळुन आले आहे. वरील सर्व आरोपीवर अमळनेर पोलीस ठाण्यात भा.द.वि.३९९, शस्त्र अधिनियम ४/२५, मु.पो.अधि. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर जगदीश पाटील यांस पोलीस स्टेशनला आणल्यावर विचारपुस करता त्यांने अमळनेर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर संजय पाटील रा. पैलाड, अमळनेर यांने त्याचा चुलत भाऊ भटु पाटील रा. पैलाड, अमळनेर यांस मा. अति. जिल्हा व सत्र न्यायालयात दरोड्याच्या घटनेत गुन्हा दाखल असुन त्याची या गुन्ह्यांतून सुटका करण्यासाठी पैश्यांची व्यवस्था करण्याबाबत सांगितले होते. सदरची बाब ही भटु दिलीप पाटील याने सांगितल्याने वरील सर्वांनी मिळुन दोराडा टाकण्याचा कट रचला. त्यानंतर दिनेश भोई याची मोटार सायकल घेवुन सुमठाणे मार्गे येत असतांना मोटर सायकलच्या दोन्ही बाजुकडील नंबर प्लेटवर चिखल लावुन अमळनेर शहरात आलो अशी हकीगत सांगितली. मात्र कोठे दरोडा टाकणार होते याबाबत काहीएक सांगितलेले नाही. आजपावेतो सदर गुन्ह्यांत जगदीश पुंडलिक पाटील, दिनेश पिंटु सोनवणे, प्रवीण रविंद्र पाटील सर्व रा. पिंपळकोठा ता. पारोळा जि.जळगांव, भटु उर्फ अमोल मधुकर पाटील उर्फ गांगुर्डे रा. शिवाजी नगर पैलाड यांना अटक करण्यात आली असुन सध्या वरील आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडवर आहेत. आरोपी जगदीश पुंडलिक पाटील हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर अमळनेर, पारोळा, एरंडोल, मारवड, जिल्हापेठ तसेच सांगवी ता. शिरपुर पोलीस स्टेशनला चोरी, जबरी चोरी, दरोडा, शासकीय कामात अडथळा आणणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोहेकॉ संजय पाटील, पोहेकाँ अरुण बागुल, पोहेकाँ किशोर पाटील, पोहेका कपिल पाटील, पोहेकाँ सुनिल पाटील, पोना योगेश पाटील, पोकाँ शेखर साळुंखे, पोकाँ गणेश पाटील, पोकाँ जितेंद्र निकुंबे यांच्या पथकाने केली आहे.