
अमळनेर:- येथील पं. नेहरू समाजकार्य महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयात प्रतिमा पूजन व अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे संचालक अभिजीत भांडारकर उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष व शिक्षण क्षेत्रातील महत्त्व याबाबत माहिती सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एस. पाटील यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा.धनराज ढगे, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ. सागर राज चव्हाण प्रा. डॉ.भरत खंडागळे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. उदय महाजन, शिक्षकेतर, कर्मचारी श्रीमती ज्योती सोनार, रवींद्र धनगर, कोमल सूर्यवंशी, ईश्वर ठाकरे देवेंद्र सरदार, कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.




