
दिव्यांगाना ५% निधिचे वाटप तर लाभार्थ्यांना भांड्यांचे केले वाटप…
अमळनेर:- फापोरे बु. ग्रा.पं. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपंग कल्यान निधी वाटप तसेच अनुसूचित जाती व जमाती मधिल लाभार्थी यांना भांडी वाटप करण्यात आले. फापोरे बु. ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून गावातील दिव्यांग व्यक्तींना शासन नियमाप्रमाणे ५% निधि वाटप केला तर अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थ्यांना १५% निधीमधून भांडी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंचा ललिता एकनाथ पाटील, उपसरपंच दिनेश वसंतराव पाटील, ग्रामसेवीका श्रीमती देसले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील , शिवराम गायकवाड, नरेंद्र पाटील, अमळनेर फ्रूटसेल माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, अमळनेर नगरपरिषद माजी पाणी पुरवठा समिती सभापती प्रविण पाटील उर्फ (राजू फापोरेकर) तसेच गावातील जेष्ठ नागरिक शालिग्राम पाटील, भालेराव पाटील, अनिल पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रताप पाटील, लक्ष्मण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, लोटन पाटील, शिवदास भिल, नुतन बिऱ्हाडे, कोतवाल ढोमण बिऱ्हाडे, गणेश पाटील, मनोज पाटील, मुरलीधर भालेराव, किरण सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र सोनवणे, पुष्कराज पाटील आदीसह गावातील नागरीक उपस्थित होते.







