पो.नि. विजय शिंदे यांचा सहकाऱ्यांना सोबत घेत नागरिकांशी संवाद सुरू…
अमळनेर:- अमळनेरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे अमळनेरकरांमधे सामाजिक सलोखा वाढीस लागावा यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
शांतता कमिटी मिटींग तसेच कधी तरूणांमधे काॅर्नर मिटींग सतत सुरू असून आता त्यांनी आपल्या अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत नागरिकांच्या व्यवसाय, ठिकाणी व रहिवास ठिकाणी थेट भेटी घेत लोकांशी परिचय करत आहेत व अडचणी जाणून घेत आहेत. नागरिकही त्यांना चांगल्या आदरतिथ्याने, उत्साहाने उत्तम प्रतिसाद देत आहे. दगडी दरवाजा, पानखिडकी, वाडी चौक, कसाली मोहल्ला, भोईवाडा अशी गल्ली असून या दरम्यान हिंदू मुस्लिम अशी लागून संलग्न मिश्र धर्मिय वस्ती, दुकाने आहेत. तसेच या भागात मंदिर मस्जिद देखील काही अंतराने आहेत. एकमेकांतील दुराव्याच्या भावना दूर करण्यासाठी व सौहार्दपूर्ण वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी अमळनेरचे पोलीस, अधिकारी यांनी गल्लीत काॅर्नर मिटींग घेत गल्लीतील लोकांसोबत त्यांच्या घरी बसून चर्चा करणे, स्थानिक दुकानांत भेट देणे असे नियोजन व उपक्रम सुरू केला आहे. आवश्यकतेनुसार काही वेळा संकोच विरहित चर्चा होण्यासाठी साध्या वेषात देखील भेटी घेतल्या जात आहेत. अनेक जणांनी यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना प्रतिक्रिया दिली की, “साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो.” यात प्रामुख्याने एपीआय राकेशसिंह परदेशी, पीएसआय नरसिंह वाघ पीएसआय अनिल भुसारे, पीएसआय अक्षदा इंगळे व हे. कॉ. संजय पाटील, चंद्रकांत पाटील, पो.ना डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, सिद्धांत सिसोदे, नम्रता जरे चालक सुनिल पाटील यांनी अतिशय उर्जायुक्त उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला आहे.