अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील मारहाणीप्रकरणी काही दिवसांपूर्वी एका गटातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुसऱ्या गटाकडून ही फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी शेख रहीम शेख मुनीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा व सुनेचे प्रेम असल्याने त्यांचे चारचौघात लग्न लावून दिले आहे. मात्र घराजवळ राहणाऱ्या सुनेचे मामा मोसिम शेख सलीम यांच्या मनात राग असल्याने ते नेहमी वाद घालत असतात. दिनांक १२ रोजी सुनेचे व तिच्या मामाचे घरी का येत नाही या कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून संध्याकाळी मोसिन शेख सलीम, आयाज शेख सलीम, जूनेर शेख जहुर, शाकीर शेख भिलू, नेगार शेख शाकीर, नसीम शेख जहुर हे लाठ्या काठ्या घेवून आले असता फिर्यादी व त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देवून मारहाण करू लागले. त्यात मुलास गंभीर दुखापत झाली असून खाजगी रुग्णालयात दाखल आहे. त्यावरून मारवड पोलिसांत वरील सहा जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ. भरत श्रीराम ईशी हे करीत आहेत.