संदिप लोहार
पातोंडा ता.अमळनेर:- येथे दि.१६ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेचा कामाचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक किरण विश्वासराव शिंदे (नाशिक) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमीपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रम ग्रामदैवत माहीजी देवी सभा मंडपात झाला. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
पातोंडा येथे शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना कामासाठी एक कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर झाले आहेत. जवळच असलेल्या नारखेडा शिवारातील तापी नदी क्षेत्रावरून सात हजार चारशे मीटर अंतरावरील पाईपलाईन, एक कूपनलिका, गावांसाठी एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व गावातील अंतर्गत पाईपलाईन आदींचा समावेश आहे. लोकसंखेच्या दृष्टिकोनाने गाव मोठे असल्याने पाणी पुरवठा पाच ते सहा दिवसांनी होतो. ग्रामपंचायती मार्फत कार्यक्रमाला सरपंच भरत बिरारी, नितीन पारधी, ग्रा.पं.सदस्य मनीषा मोरे , सोपान लोहार, माजी जि प सदस्य विनायक बिरारी, गणेश पाटील(नाशिक), राहूल लांबोळे , महेंद्र पाटील , ग्रामस्थ साहेबराव पाटील, एकनाथ लोहार, राजेंद्र यादव, रमेश संदानशिव, चंद्रभान शिंदे , पद्माकर वाघ, राजेंद्र शिंदे, शरद शिंदे, विजय मोरे, रत्नाकर पाटील, संभाजी बोरसे, भूषण बिरारी, अमोल चौधरी, प्रवीण लाड, ग्रा पं शिपाई राजेंद्र वाणी , राकेश पाटील, बाजीराव पवार, गणेश पवार, काॅन्ट्रॅक्टर शिरीष पाटील आदी मान्यवर हजर होते. सदर योजना मंजूरी करीता विशेष योगदान म्हणून कपील पवार, अनिल भदाणे, सुधाकर बाविस्कर, अनिल सुर्यवंशी या भूमिपुत्र अधिकारी वर्गाचे, तसेच सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील, भुषण देवरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने या सर्वांचे आभार मानण्यात आले. विलास चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.