चोवीस वर्षांनी भरला वर्गमित्रांचा मेळा, शिक्षकांचा केला सन्मान…
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथील माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
कर्मवीर आण्णासो शांतीलाल देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनीसह शिक्षक वृंद आणि इतर कर्मचारी स्नेह मेळाव्या प्रसंगी एकत्र आले होते. २४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र जमले. सन १९९३ ते १९९९ पर्यंत सोबत शिकणारे वर्गमित्र आणि त्यांना त्या कालखंडात लाभलेले गुरुवर्य यावेळी सगळेच एकवटले होते. या कार्यक्रमासाठी आपल्या कामा निमित्त बाहेर गावी असलेले सगळ्याच माजी विदयार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेला लेक्चर स्टँड भेट स्वरूपात देण्यात आले. विद्यमान मुख्याध्यापक सी.एस. पाटील यांनी या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला शाळेचे माजी उपमुख्याध्यापक एस एस पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पहिले मुख्याध्यापक एस.एल पाटील, शिक्षक सी. एस. पाटील, रवींद्र जैन, पी.पी पाटील, एम आर पाटील, पी.एन पाटील, बी जी पाटील मॅडम, योगेश पाटील, गायकवाड मॅडम यांच्या समवेत स्वर्गीय हंसराज नाना पाटील आणि स्वर्गीय हेमलता वडनेरे यांचे एक प्रतिनिधि बोलावून त्यांचा देखील सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन प्रभाकर पाटील (सैनिक) यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.