
लोण खु. परिसरात दिसल्याची माहिती, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट…
अमळनेर:- तालुक्यातील लोण खु. परिसरात काल रात्री बिबट्या दिसल्याचे मेसेज व फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घातली.

लोण खुर्द शिवारात रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना बिबट्या दिसून आला. चारचाकी वाहनासमोरून तो रस्ता ओंडालून पलीकडल्या बाजूला गेल्याची माहिती असून वन विभागाचे अधिकारी सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकारी व काही तरुणांनी यावेळी पाहणी करत पगमार्क आढळतात का याची पाहणी केली. यावेळी एक पायाचा ठसा आढळून आल्याची माहिती असून बिबट्या पुढे निघून गेल्याचे त्यांनी सांगितले आहे.







