शहरात व सावखेडा येथे घटना घडल्याची माहिती…
अमळनेर:- तालुक्यातील दोन ठिकाणी खून झाल्याची प्राथमिक माहिती असून अमळनेर शहरात दाजिबा नगर भागात व सावखेडा येथे घटना घडली आहे. दरम्यान दोन्ही खुनातील आरोपींना पकडण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.
शहरात दाजिबा नगर भागात २१ वर्षीय अक्षय राजू भील यास रात्री दोन तीन जणांनी मिळून पोटात चाकू मारल्याने त्याला उपचारासाठी धुळ्याला रवाना करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजते तर तालुक्यातील सावखेडा येथे गावाबाहेरील वैदू वाड्यात दोघांचे दारूच्या नशेत वाद झाले आणि डेबूजी सुरसिंग बारेला याने नाना मंगलसिंग बारेला (वय 21) याच्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि स्वतःच सरपंचला सांगितले. सरपंच व गावकऱ्यांनी पोलिसांना कळवल्याने पोलीस वेळेवर पोहचले अन्यथा आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, हेकॉ सुनील जाधव, कॉ राहुल पाटील यांना पाठवून आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजते.