अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथील एकावर अवैध वाळू वाहतूक प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तलाठी विकास परदेशी हे भरवस रस्त्याने एकलहरेकडे जात असताना एक वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले. त्यास नाव विचारले असता त्याने गणेश मोतीलाल पाटील असल्याचे सांगितले. त्यास ट्रॅक्टर मारवड पोलीसात जमा करण्यास घेवून जायचे सांगितले असता त्याने ट्रॅक्टर भरधाव पळवून नेत एका शेतात वाळू खाली करून ट्रॅक्टरसह पळून गेला अशी फिर्याद तलाठ्याने दिली असून याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. सचिन निकम हे करीत आहेत.