अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील महिलेने आपल्या दिराविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गभा प्रणिता संजय जैन ह्या घरामागील बखळ जागेत बांधलेल्या शौचालयाचा वापर करत होत्या. मात्र दिर महेश जैन व अनिता जैन यांनी त्यांना मज्जाव केला. फिर्यादीने शौचालय वडिलोपार्जित असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दिर महेश व त्याची पत्नी अनिता जैन यांनी फिर्यादीस काठीने व केस ओढून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद दिल्याने दोघांविरुद्ध मारवड पोलीसात भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना भरत गायकवाड करीत आहेत.