अमळनेर:- स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व घडवतात, आपला आत्मविश्वास वाढतो व प्रवास सुकर होतो असे प्रतिपादन आयएस तृप्ती धोडमिसे यांनी केले येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी शिक्षिका ज्योतिर्मयी दिलीप सोनवणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर डॉ.एस आर चौधरी (निवृत्त प्राचार्य) भाऊसाहेब देशमुख (निवृत्त न.प. प्रशासन अधिकारी)प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी (पाचोरा) पीएसआय शरद सैंदाणे (गोंदिया) भाऊसाहेब सुनील चौधरी (सामाजिक कार्यकर्ते धरणगाव) ग्रंथालयाचे संचालक चंद्रकांत नगावकर दीपक वाल्हे हे व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय ए एस तृप्ती धोडमिसे पुढे म्हणाल्या की अभ्यासाची ऊर्जा उर्मी आतून आली पाहिजे अंतर्गत इच्छाशक्ती व जिद्द पाहिजे. इंटरनेट यूट्यूब यातून जे चांगलं असेल तेच घ्या मोबाईलवर मर्यादा आणा बहुमूल्य वेळ वाया जातो मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असतं चांगला आहार घ्या छंद जोपासा त्यासाठी थोडा थोडा वेळ द्या छंद आपल्याला रिचार्ज करतात स्पर्धा परीक्षा हे अनिश्चित क्षेत्र आहे प्लॅन बी सुरू ठेवून तयारी करा आपला जीव व आपली मानसिकता ही खूप महत्त्वाची असते.
अमळनेर शहरात पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या ठिकाणी संपूर्णपणे मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले जाते हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला. यापुढे या केंद्रासाठी जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज भासेल त्या त्या वेळी मी मार्गदर्शन करायला तयार आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी यूपीएससी पूर्व मुख्य व मुलाखत याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. कार्यशाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, नोबेल फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष जयदीप पाटील, निवृत्त प्राचार्य डॉक्टर एस आर चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉक्टर एस ओ माळी, प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी पाचोरा, खेमचंद्र पाटील जळगाव, पीएसआय शरद सैंदाणे गोंदिया, प्रकाश पाटील (शहादा), ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी, माजी चिटणीस भाऊसाहेब देशमुख या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस चंदन पाटील, प्रेमराज पवार, चंद्रकांत देसले, विनोद जाधव, सतीश कांगणे, मनीषा कांगणे,विकास ब्राह्मणकर, विजय मोरे, प्रवीण पाटील, सोपान भवरे, किशोर सोनवणे, उमेश काटे,नरेंद्र पाटील, एम आर पाटील, प्रशांत पाटील, भैय्यासाहेब अहिरराव, महेंद्र पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सरला हरिभाऊ पाटील, विजय जगन्नाथ बोरसे, प्रकाश रामदास वाघ, दिलीप राजाराम सोनवणे, चंद्रकांत नगावकर, यांच्या दातृत्वातून विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आली. कार्यशाळेसाठी आरटीओ स्वप्निल वानखेडे, माजी नगरसेवक प्रवीण गंगाराम पाटील, जाधव क्लासेसचे संचालक विनोद जाधव, दीपक वाल्हे, जि प. शिक्षक प्रेमराज पवार, चंद्रकांत देसले, लोकमान्य टिळक स्मारक समिती, सतीश कांगणे प्रस्तुत गुरुदेव ऑर्केस्ट्रा, पंकज कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर व पंकज टायपिंग इन्स्टिट्यूट अमळनेर, साने गुरुजी ग्रंथालयाचे संचालक मंडळ व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विजयसिंह पवार यांनी केले.
सामान्य ज्ञान स्पर्धेत जयेश संजय सोनार (प्रथम संयुक्त) नमेश ज्ञानेश्वर बोरसे (प्रथम संयुक्त) धीरज भूरीलाल वैराळे (तृतीय), वकृत्व स्पर्धेत अमोल दिलीप पाटील (प्रथम), प्रियंका चंद्रकांत बारी (द्वितीय), पूजा हरिलाल पाटील (तृतीय), वादविवाद स्पर्धेत जयेश संजय सोनार (प्रथम), मेघना प्रकाश पाटील (द्वितीय), अजिंक्य प्रवीण सोनवणे (तृतीय) गीत गायन स्पर्धेत गायत्री सुनील पाटील (प्रथम ) भार्गवी चंद्रकांत देसले (द्वितीय) ध्रुव सुनील जगताप (तृतीय) अंजली संजय केदार (तृतीय) यांनी यश मिळवले.