आयएएस तृप्ती धोडमिसे यांनी केले सन्मानित…
अमळनेर:- येथील ऐतिहासिक वाचनालय असलेल्या पू सानेगुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय संचलित पू. सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी जयेश संजय सोनार याने तिहेरी यश संपादन केले. त्यास आयएएस तृप्ती धोडमिसे यांचे हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वाचनालय अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ, केंद्र संचालक विजयसिंह पवार व मान्यवर मंचावर उपस्थित होते. वक्तृत्व, सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत गटाचे नेतृत्व करून गटास प्रथम क्रमांक मिळविण्यात जयेश सोनार यशस्वी ठरला. मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविलेल्या जयेश यास निर्भय सोनार व ऍड सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. जयेश संजय सोनार याचे यशाबद्दल डीगंबर महाले, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, डॉ जी एम पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, प्रा डॉ विजय तूंटे, प्रा डॉ विजय मांटे, ऍड एस आर पाटील, प्रा डॉ एस ओ माळी, ऍड. सारांश सोनार, प्रा पराग पाटील, डॉ. अनिल शिंदे, सचिन खंडारे, सपोनि बाळकृष्ण शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक दिलीप सोनवणे, निबंधक इंद्रवदन सोनवणे, अमळनेर व नगरदेवळा येथील पत्रकार बांधव व सुवर्णकार समाजाने अभिनंदन केले.